Unseasonal Rain : अवकाळी पावसाने वीज पडून ०४ जनावरे दगावली; गावावर शोककळा

पैठण तालुक्यातील नांदलगाव येथे अचानक आलेल्या अवकाळी पावसाने वीज पडून ०४ जनावरे दगावल्याची घटना आज दि. १४ रोजी दुपारी २:१५ वाजेच्या सुमारास घडली.
Cow death by lightning
Cow death by lightningsakal

- रविंद्र गायकवाड

बिडकिन - पैठण तालुक्यातील नांदलगाव येथे अचानक आलेल्या अवकाळी पावसाने वीज पडून ०४ जनावरे दगावल्याची घटना आज दि. १४ रोजी दुपारी २:१५ वाजेच्या सुमारास घडली आहे. नांदलगाव येथील गट क्र. ०६ मधील अंकुश बाबुराव गायके यांचे ०२ गायी, बद्रीनाथ भाऊसाहेब लंभाडे यांची ०१ गाय, तसेच गट क्रमांक १७७ मधील संजय भाऊसाहेब वाघचौरे यांचा ०१ बैल सर्व रा. नांदलगाव, ता. पैठण अशी एकुण ०४ जनावरे दगावली आहेत.

अचानक सुरू झालेल्या अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने वीज पडल्याने हि घटना घडली आहे. या घटनेची माहिती परिसरात पसरताच सर्व नागरिकांच्या वतीने हळहळ व्यक्त केली जात आहे. यावेळी ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक आणि तलाठी यांच्या वतीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com