

Dharashiv News
esakal
धाराशिव: जिल्ह्यामध्ये सोमवार ते गुरुवार (ता. १६ ते १९) या कालावधीत झालेल्या अवकाळी पाऊस, सोसाट्याचा वारा आणि गारपिटीमुळे शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने सादर केलेल्या प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यातील ७१ गावांना नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला असून, एक हजार ४०७.४० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.