Nanded News: नांदेड जिल्हा बँक निवडणुकीचा आज देगलूरात फैसला; सहकारातील राजकीय चुरस शिगेला

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या देगलूर तालुक्यातील संचालकपदासाठी आज (ता. २६) मतदान होत आहे. काँग्रेसच्या श्वेता बसवराज पाटील आणि भाजपचे विद्यमान संचालक विजयसिंह देशमुख हाणेगावकर यांच्यात थेट लढत होत असून सहकारातील राजकीय समीकरणांकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
Nanded District Central Cooperative Bank election voting in Deglur with direct contest between Congress and BJP candidates

Nanded District Central Cooperative Bank election voting in Deglur with direct contest between Congress and BJP candidates

Sakal

Updated on

देगलूर : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या देगलूर तालुक्यातील एका संचालकपदासाठी रविवारी (ता. २६) मतदान होत असून, सहकारातील राजकीय समीकरणे आणि पडद्यामागील घडामोडींमुळे या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. मतदार सुरक्षित राहावेत म्हणून काही जणांना सहलीवर पाठविण्यात आल्याची चर्चा असून, हे मतदार रविवारी थेट मतदान केंद्रावर दाखल होणार असल्याने वातावरण अधिकच रंगतदार झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com