Nanded News: नांदेडमध्ये गॅस एजन्सीसमोर पहाटेपासून रांगा; घरगुती सिलिंडरवर व्यावसायिकांची नजर; घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर वाढला

Commercial Use of Domestic LPG Raises Concerns: नांदेड शहरात घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा पुरेसा असल्याचा प्रशासनाचा दावा असला तरी एजन्सीसमोर नागरिकांच्या लांब रांगा लागल्या आहेत. व्यावसायिकांकडून घरगुती गॅसचा वापर आणि काळाबाजाराच्या चर्चेमुळे नागरिकांमध्ये सिलिंडर मिळण्याबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Nanded News

Nanded News

esakal

Updated on

नांदेड: जिल्हा प्रशासनाकडून नांदेड जिल्ह्यात घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा पुरेसा असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात शहरातील अनेक गॅस एजन्सीसमोर गुरुवारी पहाटेपासूनच नागरिकांच्या मोठ्या रांगा दिसून आल्या. सिलिंडर मिळेल की नाही या भीतीमुळे नागरिक मोठ्या संख्येने एजन्सीकडे धाव घेत असल्याचे चित्र आहे.

प्रत्यक्षात घरगुती गॅस पुरेसा उपलब्ध असल्याचे प्रशासन सांगत असताना रांगा लागण्यामागे काळाबाजाराचेही कारण असू शकते, अशी चर्चा आहे. नांदेड शहरात एक हजारपेक्षा अधिक हॉटेल्स, मेस व खानावळी, भोजनालये सुरू आहेत. या ठिकाणी व्यावसायिक गॅसऐवजी घरगुती गॅस सिलिंडरचा सर्रास वापर होत असल्याचे दिसून येते. अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू असला तरी याबाबत कारवाई अत्यल्प प्रमाणात झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com