Nanded Farmer Death: ‘माय मला लय मारायलेत, तरास सोसंना, पैशे टाक...’

Finance Loan Dispute: दहा हजारांसाठी जीव गेलेल्या शेतकऱ्याचा आईसोबत फोनवर झाला होता संवाद
Family Members of Farmer Chandrakant Shinde Allege Assault and Coercive Loan Recovery After His Body Was Found at a Finance Office in Nanded

Family Members of Farmer Chandrakant Shinde Allege Assault and Coercive Loan Recovery After His Body Was Found at a Finance Office in Nanded

esakal

Updated on: 

मह्य लेकरू याइनं मारून टाकलं,.सांगतेत फाशी घेतली म्हणून...

ते काय म्हणू लागले? पैसे आधी पोचती करा, आम्हाला माणूस नको, पैसे लागतात. रात्री एका बाईचा फोन आला होता, ती म्हणाली पैसे दिऊन टाका, नाहीतर लय मारू. आम्ही काहीबी करू शकतो, पैसे भरावेच लागतील. मह्य लेकरू याइनं मारून टाकलं हो आन आता सांगतेत फाशी घेतली म्हणून... एवढे एवढे दोन पोरं हायती त्याला. त्याईनं कुणाकडं पहाव? सरशाबाई सांगत होत्या . ‘‘दोन माणसं आली व्हती, त्याला गाडीवर बसून नेलं. आमाला वाटलं येईल परत. पण एक दिवस फोनवर ते म्हणू लागलं, माय मला लय मारायलेत, तरास सोसंना झालाय, मला पैसे टाक. घरात लाख रुपये कुठं ऱ्हातात व्हय, जोड त लावा लागंल की न्हाई, असं मी त्याला म्हणली व्हती. मग फोन बंद झाला... मह्य लेकरू याइनं मारून टाकलं, आन आता सांगतेत फाशी घेतली म्हणून...’

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com