नांदेडला सभापती, उपसभापतिपदांच्या निवडणुकीत रस्सीखेच

file photo
file photo

नांदेड : जिल्ह्यातील १६ पंचायत समितींच्या सभापती आणि उपसभापतिपदांची निवड सोमवारी (ता. सात) दुपारी करण्यात आली. त्यात कॉँग्रेसला आठ सभापती व आठ उपसभापतिपद, भारतीय जनता पक्षाला सहा सभापती व पाच उपसभापतिपद, तर शिवसेनेला एक सभापती आणि दोन उपसभापतिपद मिळाले. धर्माबादची निवडणूक हाणामारी व गोंधळामुळे लांबणीवर पडली.

राज्यात महाआघाडीचे सरकार आल्यानंतर जिल्ह्याजिल्ह्यात महाआघाडीचा पॅटर्न राबविण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यातही हा पॅटर्न राबविण्यात आला असला तरी त्यातही शेवटपर्यंत रस्सीखेच पाहायला मिळाली. अर्धापूरला महाविकास आघाडीचा प्रयोग झाला. कॉँग्रेसचा सभापती, तर सेनेचा उपसभापती झाला. हदगावलाही महाआघाडीचा प्रयोग झाला असून सभापती शिवसेना, तर उपसभापतिपद कॉँग्रेसला मिळाले. माहूरला कॉँग्रेसचा सभापती, तर शिवसेनेचा उपसभापती झाला. कंधारला दोन्ही उमेदवारांना समसमान मते पडली. त्यामुळे सभापतिपद व उपसभापतिपद ईश्‍वरचिठ्ठीने ठरवण्यात आले. त्यात सभापती कॉंग्रेसचा, तर उपसभापती भाजपचा झाला.

आपआपले राखले गड
बिलोलीत भाजपला स्पष्ट बहुमत असूनही पक्षांतर्गत गटबाजीमुळे सभापतिपद भाजपला, तर उपसभापतिपद कॉँग्रेसला मिळाले. नायगावलाही अशीच परिस्थिती झाली, त्यात भाजपचा सभापती, तर उपसभापतिपद कॉँग्रेसला मिळाले. किनवट, मुखेड, लोहा आणि उमरी या चार ठिकाणी भाजपचेच सभापती व उपसभापती झाले. खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी लोहा, आमदार डॉ. तुषार राठोड यांनी मुखेडला, तर माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर यांनी उमरीत वर्चस्व राखले.

कॉँग्रेसला मिळाले यश
नांदेड, हिमायतनगर, भोकर, देगलूर आणि मुदखेड या पाच ठिकाणी कॉँग्रेसचेच सभापती व उपसभापती झाले. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी भोकर, मुदखेड आणि अर्धापूरला, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत यांनी नांदेडला, आमदार रावसाहेब अंतापूरकर यांनी देगलूरला, तर आमदार माधव पाटील जवळगावकर यांनी हदगावला वर्चस्व राखले.

पंचायत समितीचे नाव, सभापती व उपसभापती पुढीलप्रमाणे
१) नांदेड - कावेरी वाघमारे (कॉँग्रेस),  राजू हटकर (कॉँग्रेस)
२) माहूर - निलाबाई राठोड (कॉँग्रेस), उमेश जाधव (शिवसेना)
३) किनवट - हिराबाई आडे (भाजप), कपिल करेवाड (भाजप)
४) हदगाव - महादाबाई तम्मलवाड (शिवसेना), शंकर मेंडके (कॉँग्रेस)
५) हिमायतनगर - सुरेखा आडे (कॉँग्रेस), शशीकला कौठेकर (कॉँग्रेस)
६) भोकर - नीता रावलोड (कॉँग्रेस), नागोराव कोढुळे (कॉँग्रेस)
७) अर्धापूर - कांताबाई सावंत (कॉँग्रेस), अशोक कपाटे (शिवसेना)
८) मुदखेड - बालाजी सूर्यतळे (कॉँग्रेस), आनंदा गादिलवाड (कॉँग्रेस)
९) बिलोली - सुंदरबाई पाटील (भाजप), शंकर यंकम (कॉँग्रेस)
१०) देगलूर - संजय वलकल्ले (कॉँग्रेस), ज्योती चिंतलवार (कॉँग्रेस)
११) मुखेड - सविता पाटील (भाजप), हरिबाई गोंड (भाजप)
१२) लोहा - आनंद शिंदे पाटील (भाजप), नरेंद्र गायकवाड (भाजप)
१३) कंधार - लक्ष्मीबाई घोरबांड (कॉंग्रेस), लता वडजे (भाजप)
१४) नायगाव - प्रभावती कत्ते (भाजप), संजय पाटील शेळगावकर (कॉँग्रेस)
१५) उमरी - सावित्रीबाई सोनकांबळे (भाजप), शिरीष गोरठेकर (भाजप)
१६) धर्माबाद - निवडणूक लांबणीवर 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com