

Nanded Government Hospital Faces Serious Waste Management Issue
esakal
नांदेड : शहरातील विष्णुपुरी परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय परिसरात स्वच्छतेचा गंभीर प्रश्न उभा राहिला असून रुग्णालयाच्या आत आणि बाहेर मोठ्या प्रमाणावर कचरा साचल्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या या रुग्णालयातच अस्वच्छतेचे चित्र दिसत असल्याने नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे.