Police investigate the fatal tempo attack following a dispute over open village land in Khambegaon.
esakal
लोहा : गावठाणातील मोकळ्या जागेच्या वादातून झालेल्या बाचाबाचीत मालवाहू टेंपो अंगावर घालून ४६ वर्षीय व्यक्तीचा खून केल्याची घटना रविवारी (ता. एक) सकाळी साडेअकराच्या सुमारास खांबेगाव (ता. लोहा) येथील बसस्थानक परिसरात घडली. अरुण भाऊराव कुंटे (वय ४६, रा. खांबेगाव), असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी वत्सलेश्वर केशव हिलाल आणि नागेश केशव हिलाल (दोघे रा. खांबेगाव) या दोन भावांना लोहा पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.