शिक्षणमंत्री तावडेंना पत्र लिहून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न

crime
crime

मुखेड : मुखेड येथील शाहीर अण्णाभाऊ साठे माध्यमिक व उच्चामाध्यमिक विद्यालयाचे शिक्षक बाबुराव परशुराम पवळे यांनी शुक्रवारी सकाळी आपल्या गावी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना पत्र लिहून विषारी औषध करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

सविस्तर असे की, मुखेड येथील शाहीर अण्णाभाऊ साठे माध्यमिक व उच्चामाध्यमिक विद्यालयाचे शिक्षक बाबुराव परशुराम पवळे (वय 40) हे 2013 मध्ये मिळालेल्या माध्यमिक वाढीव तुकडीवर गेल्या 5 वर्षापासून मराठी विषयाचे ज्ञानदानाचे बिनपगारी काम करीत असताना ही शासनाचे शिक्षण विषयक नवीन सारखे बदलते धोरण यामुळे निराश होऊन महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना पत्र लिहूण विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या पत्रात बाबुराव परशुराम पवळे यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना असे म्हणाले की, तावडे साहेब आपणाला सत्ता हवी आहे. दररोज एक जीआर काढतात एक तरी त्यांना जीआर पाठ आहे का? साहेब मी तुम्हाला शिवीगाळ करीत नाही मला चुकीचे समजू नका. आज माझे 35 वर्ष असताना टि.सी. वर 40 वर्ष आहे. सकाळी 5 पासुन रात्री 10 पर्यंत काम करुनही मी व माझे कुटूंब उपाशी राहत आहोत याचा थोडा विचार करा. माझे भाऊ खुप चांगले आहेत. अहोरात्र शेतात काम करतात त्यांचा चेहरा बघितला की, पोटात उखळी मारते मी उच्चशिक्षित आहे. समाजाला असे वाटते बाबु एवढा हुशार असा का केला. मी सर्वांची माफी मागतो मला अजिबात सहन झाले नाही. लोक म्हणतात पगार केंव्हा सुरु होते? किती पगार आहे? अशा प्रश्नाला 5 वर्षात किती उत्तरे देऊ माझ्या डोक्यात मृत्यू न करण्याचा खुप वेळेस आले पण माझा संयम आज सुटला.

उच्चशिक्षित होऊन काय फायदा लोक म्हणतात बाबु असं का केला असेल. नोकरी असून बिनपगारी मला आत्तापर्यंत मुखेड मधल्या लोकांनी मान सन्मान दिला त्याबबद्दल मी आभारी आहे. बालाजी इंगोले माझ्या मृत्यूनंतर माझ्या परिवारावर बोट ठेवू नका. माझे भाऊ माझ्या मुलावर, पत्नीवर अन्याय करणार नाहीत. अनिता खुप चांगली आहे. अनिता मला माफ कर मी तुझ्यावर जबाबदारी सोपवत आहे. तुम्ही तिघही भाऊ चांगले वागा. राजा तुपण चांगले वागत राहा. माझ्यानंतर माझ्या मुलाचे काय मी अक्षरक्ष: 5 ते 6 दिवस रडून काढलो मला सहन झाले नाही. असे तीन पेजच्या पत्रात आपले शिक्षक बाबुराव परशुराम पवळे यांनी म्हणणे मांडले. पण त्यातील एकच पेज उपलब्ध झाले आहे. शिक्षक बाबुराव परशुराम पवळे हे आपली मुलगी आजारी असल्यामुळे आठवडा भरापासुन नांदेड येथे मुलीचा उपचार करत होते. पण दवाखाण्यासाठी लागणारा मोठया प्रमाणात लागणारा पैसा जवळ नसल्यामुळे आलेल्या नैराश्यातून व रोज निघणाया नविन नविन शिक्षण खात्यातील जी.आर.मुळे त्रस्त होऊन त्यांनी आपल्या राहत्या गावी मौजे मरवाळी तांडा ता. नायगांव जि. नांदेड येथे विषारी औषध प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना घडताच कुटूंबातील नातेवाईकांनी नायगांव येथील दवाखान्यातील दाखल करुन प्राथमिक उपचार केला व तेथून 108 रुग्णवाहिकेने नांदेड येथील संजीवनी या खाजगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार चालू आहेत. तर घटना घडताच शाळेचे संचालक माजी आमदार अविनाश घाटे, प्राचार्य मनोहर तोटरे, प्राचार्य ए.एस. भांगे यांच्यासह कर्मचायांनी दवाखान्यात भेट देऊन प्रकृतीची विचारपूस केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com