

Nanded News
esakal
नांदेड: जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागातील तालुका स्तरावर कार्यरत गट समन्वयक व तालुका समन्वयक यांचे डिसेंबर २०२५ पासून मानधन थकीत असल्याने त्यांच्यासमोर गंभीर आर्थिक संकट उभे ठाकले आहे.
सलग चार महिन्यांपासून वेतन न मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असून, याबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.