
आखाडा बाळापूर ( जिल्हा हिंगोली ) : कळमनुरी तालुक्यातील पिंपरी गावाजवळ शुक्रवारी (ता. चार) एका बंद कारमध्ये अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सदरील कार सकाळपासून बंद असल्याने संध्याकाळी त्या कारमध्ये मृतदेह असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर मयताच्या नातेवाईकांनी घटनास्थळ गाठले. मयत हा कलदगाव (ता. अर्धापूर, जिल्हा नांदेड ) येथील माणिक राजेगोरे (वय ४८) असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आखाडा बाळापूर ते वारंगा रस्त्यावर असलेल्या पिंपरी शिवारामध्ये शुक्रवार (ता. चार) सकाळपासून एक स्कोडा कंपनीची कार रस्त्याच्या कडेला एका दगडावर गेल्याने अडकून उभी होती. ही कार सकाळपासून उभी असल्याने कोणाच्याही लक्षात आले नाही. संध्याकाळी साडेसहा ते आठच्या सुमारास काही व्यक्तीने आखाडा बाळापूर येथील पोलिस स्टेशनला अपघातग्रस्त कारमध्ये एक मृतदेह असल्याची माहिती दिली.
हेही वाचा - पर्यावरण दिन : ऋतुचक्रातील बदल थांबविण्यासाठी प्रत्येकाने एक झाड लावणे आवश्यक
यावरुन आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रवि हुंडेकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनेची गंभीरता लक्षात घेता त्यांनी पोलिस अधीक्षक राकेश कलासागर आणि पोलिस उपविभागीय अधिकारी हाश्मी यांना माहिती दिली. तोपर्यंत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय हे आपले सहकारी फौजदार शिवसांब घेवारे यांच्यासह आदी पोलिस अधिकारी, कर्मचारी यांनी धाव घेतली. माणिक राजेगोरे याचा गळा आवळून नंतर पेट्रोल टाकून जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. अंगुली मुद्रा तज्ज्ञ यांनाही पाचारण केले.
पोलिसांनी तपासणी केली असता तो नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात असलेल्या कलदगाव येथील माणिक राजगोरे असल्याचे उघड झाले. शुक्रवारी दुपारपर्यंत ढगाळ वातावरण असल्याने सदर कारकडे कुणाचे लक्ष गेले नाही. संध्याकाळी एका शेतकऱ्याच्या लक्षात आल्याने त्याने हा प्रकार पोलिसांना कळविला. घटनास्थळी पोलिस अधिकाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत प्रत्येक वस्तुचे बारकाईने निरीक्षण केले. काही वस्तु तपासणीसाठी ताब्यात घेतल्या. ज्यात पेट्रोल, सॅनिटायझर, रुमाल व काही कागदपत्रांचा समावेश आहे. या प्रकरणात आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरु होती.
येथे क्लिक करा - हुंड्डाविरोधात ऍट्रोसिटी कायद्यांतर्गत कारवाई करून त्याला अटक करावी; अन्यथा राज्यभर आंदोलन करु- ताजणे
सदरचा मृतदेह हा आखाडा बाळापूर सामान्य रुग्णालयात दाखल केला. परंतु त्याच्या मतदेहाची उत्तरीय तपासणी ही नांदेडला करा असे खासदार हेमंत पाटील यांनी सांगितल्यानंतर त्याचा मृतदेह नांदेडला हलविला आहे. शनिवारी (ता. पाच) सायंकाळी उशिरा त्याच्या मुळगावी कलदगाव येथे अंत्यस्कार करण्यात येणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. दरम्यान पोलिसांनी एकाला ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले. मयत माणिक राजेगोरे हा नांदेडचे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांचा मावसभाऊ तर संभाजी ब्रिगेडचे संतोष गव्हाणे यांचा मामे भाऊ होत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.