esakal | Video : नांदेडकरांनो सावधान, जिल्ह्यात १४४ कलम लागू- जिल्हाधिकारी डॉ. विपीन
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded News

कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी डाॅ. विपीन यांनी जिल्ह्यात 144 कलम लागू केला असून, नागरिकांनी अत्यावश्यक असेल तेव्हाच, घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. 

Video : नांदेडकरांनो सावधान, जिल्ह्यात १४४ कलम लागू- जिल्हाधिकारी डॉ. विपीन

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : पुणे- मुंबईवरुन आलेल्‍या विलगीकरणासाठी स्‍टॅम्‍पींग केलेल्या व्‍यक्‍तीनी घराबाहेर पडू नयेत. जर सदरचा व्‍यक्‍ती बाहेर फिरतांना आढळून आल्‍यास पोलीस प्रशासनाच्‍यावतीने आरोग्‍य विभागाकडून तयार करण्‍यात आलेल्‍या क्‍वारंटाईन वार्डमध्‍ये ठेवण्‍यात यावेत, असेही निर्देश जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांनी केले. पहाटे पाचवाजल्यापासून १४४ कलम लागू करण्‍यात येत आहे, असे जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्‍यासाठीच्‍या प्रतिबंधात्‍मक उपाययोजनेची बैठक जिल्‍हाधिकारी यांच्‍या कक्षेत आज घेण्‍यात आली. त्‍यावेळी डॉ. विपीन बोलत होते. बैठकीस जिल्‍हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, अप्‍पर जिल्‍हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्‍हाधिकारी डॉ. सचिन खल्‍लाळ, जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्‍हा परिषदेचे जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी  बालाजी शिंदे, अन्‍न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्‍त टी. सी. बोराळकर, उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, जिल्‍हा उपनिबंधक प्रवीण फडणीस, जिल्‍हा अग्रणी बॅंक अधिकारी गणेश पठारे, मनपाचे आरोग्‍य अधिकारी डॉ. सुरेशसिंह बिसेन, मनपाचे सहाय्यक आयुक्‍त अजीतपालसिंग संधू, एसटी महामंडळाचे विभागीय व्‍यवस्‍थापक अविनाश कचरे, विभागीय वाहतूक अधिकारी राहूल जाधव यांच्यासह विविध विभागाच्‍या विभाग प्रमुखांची यावेळी उपस्थिती होती.

हेही वाचा - जनता कर्फ्यू : पोलिसांचा चोख बंदोबस्त, एसपी मगर रस्त्यावर

शहरातील भाजीपाला व जीवनावश्‍यक बाबी वगळता बंद राहतील

जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन इटणकर बैठकीत म्‍हणाले की, १४४ कलम लागू केल्‍यामुळे पाच व्‍यक्‍तींपेक्षा अधिक व्‍यक्‍ती एकत्रित येणार नाहीत, याची दक्षता नागरिकांनी घ्‍यावी. तसेच एमआयडीसी भागातील खाद्यतेल व शहरातील भाजीपाला व जीवनावश्‍यक बाबी वगळता बंद राहतील. जिल्‍ह्यातील ओपीडी बंद राहतील. परंतु सर्दी, खोकला, ताप अशा प्रकारचे आजार असल्‍यास तात्‍काळ आरोग्‍य सेवा वार्डामध्‍ये तपासणी करण्‍यात यावेत, असेही जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी यावेळी निर्देशित दिले.

कोरंटाईन करण्‍यात आलेल्‍या व्‍यक्‍तींची चौकशी करण्‍यात यावी

आरोग्‍य विभागाने आवश्‍यक असलेले औषधी व साहित्‍य तात्‍काळ उपलब्‍ध करुन दरपत्रके मागवून करण्‍यात यावीत. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्‍य अधिकारी यांनी तलाठी, ग्रामसेवक, आशा कार्यकर्ती यांच्‍यामार्फत मुंबई- पुण्‍यावरुन आलेल्‍या व्‍यक्‍तींना घरी कोरंटाईन करण्‍यात आलेल्‍या व्‍यक्‍तींची चौकशी करण्‍यात यावी. यामध्‍ये तलाठी, ग्रामसेवक यांनी तपासणी करावी. त्‍यातील दहा टक्‍के तपासणी मंडळ अधिकारी व विस्‍तार अधिकारी पंचायत समिती यांनी दहा टक्‍के करावी. तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी पाच टक्‍के तपासणी करावी. घरी क्‍वारंटाईन करण्‍यात आलेल्‍या व्‍यक्‍ती घराबाहेर फिरणार नाहीत. जर आढळून आल्‍यास तालुकास्‍तरावर तयार करण्‍यात आलेल्‍या क्‍वारंटाईन कक्षात ठेवण्‍यात यावेत.

येथे क्लिक करा - बंदमुळे काकडी चारली बैलांना

गर्दी वाढल्यास बँकाही बंद ठेवणार

एपीएमसीमध्‍ये व बॅंकेत येणा-या शेतक-यांची संख्‍या एकावेळेस पाचपेक्षा अधिक राहणार नाही, याची दक्षता घेण्‍याबाबत यापुर्वीच आदेशित करण्‍यात आले. तथापी गर्दी वाढत असल्‍यास ता. ३१ मार्च २०२० पर्यंत एपीएमसी व बॅंका बंद करण्‍याबाबत जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले.

loading image