नांदेडकरांनी घेतला ‘फिटनेस राईड’चा आनंद

cycle1
cycle1

नांदेड ः ‘सकाळ’ नांदेड आवृत्तीच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त रविवारी (ता. .एक) सकाळी सहा वाजता आयोजित केलेल्या ‘फन, फिटनेस अँड फ्रीडम सायकल राईड’ला नांदेडकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया यांच्या हस्ते सायकल राईडचे उद्‍घाटन करण्यात आले


‘ट्रॅक अँड ट्रायल’च्या विवेक सायकल स्टोअरतर्फे प्रायोजित ‘फन, फिटनेस अँड फ्रीडम सायकल राईड’ला सकाळी सहा वाजता सुरवात झाली. वजिराबाद येथील विवेक सायकल स्टोअर येथून राईडची सुरवात झाली. विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी झेंडी दाखवून या राईडची सुरवात केली. या वेळी ‘सकाळ’च्या मराठवाडा आवृत्तीचे निवासी संपादक दयानंद माने, नांदेड सायकलिस्ट क्लबचे अध्यक्ष डॉ. देवेंद्रसिंह पालीवाल, नांदेड क्लबचे सचिव डॉ. लक्ष्मीकांत बजाज, सहसचिव हरजिंदरसिंघ चिरागिया, डॉ. दीपक अग्रवाल, आझीम पंजवानी, विवेक सावरगावकर आदींची उपस्थिती होते.

हेही वाचा -

३५ किलोमीटरची होती स्पर्धा
वजिराबाद ते लिंबगाव व परत वजिराबाद अशी ३५ किलोमीटर अंतराची ही सायकल राईड सर्वांनी उत्साहात पूर्ण केली. नांदेडकरांना सायकल चालविण्याची सवय लागावी व पर्यायाने सुदृढ समाज निर्मिती व्हावी, या उद्देशाने आयोजित या सायकल राईडमध्ये असंख्य सायकलप्रेमींनी सहभाग नोंदविला. त्यामध्ये डॉक्टर, व्यापारी, उद्योजक, शासकीय, निमशासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, पोलिस विभागासह शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यी, त्याचबरोबर व्यावसायिक सायकलपटूंनी या उपक्रमात सहभाग घेत उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला.

खेळांडूचा गौरव
‘फिटनेस राईड’ पूर्ण झाल्यावर सहभागी सर्व सायकलपटूंना अल्पोपहार व एनर्जी ड्रिंक्स देण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते व विवेक सायकल स्टोअरतर्फे प्रमाणपत्र, पदक व टी शर्ट देऊन सम्मानित करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय सायकलिस्ट आझीम पंजवानी, जिल्हा सॉफ्ट बॉल असोसिएशनचे अध्यक्ष विजय पाटणी, डॉ. पालीवाल, डॉ. बजाज, पोलिस विभागाचे माजी क्रीडा विभागप्रमुख मुजीब खान, संतोष सोनसळे, ज्येष्ठ राष्ट्रीय खेळाडू प्रवीण गायकवाड आदींची उपस्थिती होती. 

हेही वाचा -

खेळाडूंचा विशेष गौरव
पोलिस विभागातर्फे महिला जलतरणपटू अंजना शिंदे व राष्ट्रीय सायकलपटू साईनाथ सोनसळे यांचा विशेष गौरव करण्यात आला. ‘सकाळ’चे निवासी संपादक दयानंद माने यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले. डॉ. पालीवाल यांनी मनोगत व्यक्त केले. क्रीडा बातमीदार प्रा. इम्तियाज खान यांनी सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार मानले. राईड यशस्वी करण्यात सायकलिंग असोसिएशनचे सचिव बंटी सोनसळे, निलेश खराटे, प्रभू धुमाळ, वैभव अंभोरे, चेतन परमानी, इकबाल सिद्दिकी, अलीम खान, अमोल कल्याणकर, इब्राहिम शेख आदींनी पुढाकार घेतला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com