esakal | Video : ‘जनता कर्फ्यू’ : नांदेडकरांच्या प्रतिसादाला सॅल्यूट
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded News

‘कोरोना व्हायरस’वर विजय मिळविण्यासाठी रविवारी नांदेडकरांनी ‘जनता कर्फ्यू’ या पंतप्रधान व मुख्यमंत्री यांच्या आवाहनाला शंभर टक्के प्रतिसाद देवून, घरात राहणेच पसंत केले. परिणामी शहरातील नेहमी वर्दळीची ठिकाणी रविवारी शुकशुकाट होता.

Video : ‘जनता कर्फ्यू’ : नांदेडकरांच्या प्रतिसादाला सॅल्यूट

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड : कोरोना व्हायऱ्हसला जिथल्या तिथेच पायबंद करण्याच्या हेतुने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी (ता.२२ मार्च २०२०) रोजी ‘जनता’ कर्फ्यु घोषित केला. त्याला नांदेडकरांनी ‘लॉक डाऊन’ करत शंभर टक्के प्रतिसाद दिला. रेल्वे स्थानकासह बस स्थानकातही प्रवाशी फिरकले नाहीत.

एसटी महामंडळाने तीन दिवसापूर्वीच लाब पल्ल्यांच्या बसेस बंद केल्या होत्या. परंतु एकदम बस बंद करणे संयुक्तीक ठरणार नाही. म्हणून महामंडळाने जिल्ह्यांतर्गत बसेस व ६० ते ७० किलो मिटर अंतरावरील जिल्ह्यापर्यंत बसेस सुरु ठेवण्यात आल्या होत्या. शनिवारी (ता.२१ मार्च २०२०) रोजी संध्याकाळी बाहेरील डेपोच्या दोन ते तीन बसेस आल्या होत्या. त्या बसेस रविवारी सकाळी सहा वाजताच निघुन गेल्या. त्यानंतर जिल्ह्यातील हदगाव, बिलोली, माहुर, किनवट, कंधार, भोकर या ठिकाणासह इतर बसस्थानकात एकही प्रवाशी आला नव्हता.

रेल्वे स्थानाकातही शुकशुकाट
रेल्वेनी दाटी वाटीने प्रवास करुन पुणे - मुंबई शहरातील प्रवाशी शहरात दाखल होवून संभाव्य कोरोना व्हायऱ्हस फैलणार नाही याची खबरादारी नांदेडच्या दक्षिण रेल्वे विभागानेही घेतली आहे. काही दिवसापूर्वीच मुंबईहून नांदेडला येणाऱ्या व जाणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. रविवारी ‘जनता कर्फ्यु’ असल्याने नांदेड रेल्वे विभागाने जवळपास ४२ रेल्वे गाड्या रद्द केल्या. याबद्दलची प्रवाशांना विविध माध्यमातून माहिती पोहचवण्यात आली होती. त्यामुळे रविवारी जनता कर्फ्युमुळे नांदेडच्या रेल्वे स्थानकाकडे एकही प्रवाशी फिरकला नाही. एरवी प्रवाशांच्या गर्दीने गजबजलेले रेल्वे स्थानक प्रवाशांअभावी सुनेसुने होते.

हेही वाचा - कोरोना : मी तयार आहे तुम्ही तयार आहात ना? ​

व्यापार, उद्योग प्रतिष्ठाने कडकडीत बंद
शनिवारी (ता.२१ मार्च २०२०) जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर, महापालिकेचे नगरसचिव अजितपालसिंघ संधु, उपायुक्त विलास भोसीकर यांनी रस्त्यावर उतरुन नागरीकांना ‘जनता कर्फ्यु’मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यांच्या या आवाहनास नागरीकांनी शनिवारपासून सुरुवात करून मोठा प्रतिसाद देण्यास सुरुवात केली होती. वजिराबाद येथील मर्चंड व्यापारी असोसिएशनच्या वतीने शुक्रवारी सायंकाळीच शहरातील व्यापारी, उद्योजक, प्रतिष्ठाने यांना आवाहन करुन २३ मार्चपासून तीन दिवस प्रतिष्ठाने बंद ठेवण्यासाठी आवाहन केले होते. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने देखील खबरदारी म्हणून लांब पल्ल्याच्या गाड्या पूर्णपणे बंद केल्या असून, जिथे अवश्यक आहे त्या रुटवर गाड्या सोडल्या जात आहेत.

शहरात कडकडीत बंद
विदेश, मुंबई, पुणे, नागपूर, हैदराबाद, अहमदनगर, यवतमाळ अशी बाहेरुन नांदेड शहरात दाखल झालेल्या नागरीकांनी खासगी रुग्णालयात न जाता थेट शासकीय रुग्णालयात यावीत आणि आरोग्याची तपासणी करुन घ्यावी, यासाठी खासगी रुग्णालयातील अत्यावश्यक सेवा वगळता बाह्यरुग्ण तपासणी पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. रविवारी शहरातील तरोडानाका परिसर, वर्कशॉप, श्रीनगर, शिवाजीनगर, आनंदनगर, भाग्यनगर, अण्णा भाऊ साठे चौक, जिल्हा परिषद परिसर, छत्रपती चौक, राज कॉर्नर, आयटीआय चौक, महाविर चौक, गुरुद्वारा परीसर, जुना मोंढा मार्केट, एमजी रोड, महम्मद अली रोड, बर्की चौक, सराफा बाजार, देगलुरनाका, महाराणा प्रताप चौक, सीडको हडको परिसरासह शहरात ठिकाठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता.

loading image