file photo
file photo

नांदेडच्या झेडपीला लागले निवडीचे वेध 

Published on

नांदेड: जिल्हापरिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपल्याने राज्यस्तरावरुन विधानसभा निवडणूकीच्या आचारसंहितेपूर्वी १२० दिवसाची मुदत वाढवून देण्यात आली होती. त्यानुसार शुक्रवारी (ता.२०) मुदत संपल्याने जिल्हाअधिकारी अरुण डोंगरे यांनी शनिवारी (ता.२१) पंचायत समिती सभापतींच्या निवड प्रक्रियेला पुढील आदेशापर्यंत स्थगितीच्या लेखी सुचना दिल्या. त्यामुळे माळेगाव यात्रेवरील निवडीचे सावट हटले, पण शनिवारी (ता.२८) यात्रेचा समारोप होताच जिल्हापरिषदेला आता निवडीचे वेध लागले आहेत. 

कार्यकाळ संपल्याने जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी शासनस्तरावरुन नोव्हेंबर (ता.१९) अध्यक्षपदासाठी आरक्षण सोडत जाहिर करण्यात आली. त्यानुसार जिल्हापरिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जमातीच्या महिला प्रवर्गासाठी राखीव सुटल्याने भल्या-भल्यांचा हिरमोड झाला. त्यातच राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्याने त्याचे पडसाद जिल्ह्याच्या राजकारणावर होनं सहाजीकच. त्यामुळे महापालिका, जिल्हापरिषदांमध्ये महाविकास आघाडीचे सुत्र उदयास आल्याने नवीन समीकरणांची बेरीज सुरु झाली आहे. 

जिल्हाअधिकाऱ्यांचे आदेश 
शासन निर्णयानुसार शुक्रवारी (ता.२०) मुदत संपल्याने पंचायत समिती सभापती निवडीसाठी जिल्हाअधिकारी अरुण डोंगरे यांनी शनिवारी (ता.२१) तालुकास्तरावर सभापती तर रविवारी (ता.२२) जिल्हा परिषद अध्यक्ष निवड प्रक्रियेचे आदेश जारी केले होते. त्यामुळे जिल्हापरिषदेच्या नियंत्रणातील दक्षीण भारतात प्रसिद्ध माळेगाव यात्रेची लगबग सुरु असतानाच अध्यक्ष निवडीचा कयास लावण्यात येत होता.

यात्रेवरील सावट हटले

तसा पदाधिकारी निवडीचा काही प्रमाणात यात्रा नियोजनावर परिनाम झाला. मात्र, जिल्हाअकिधारी श्री. डोंगरे यांनी पुढील आदेशापर्यंत पंचायत समिती सभापती निवड प्रक्रियेस स्थगितीच्या लेखी सुचना जारी केल्या. त्यामुळे माळेगाव यात्रा उत्सवावरील अध्यक्ष निवडीचे सावट हटले आणि विद्यमान अध्यक्षा शांताबाई जवळगावकर यांच्या अधिपत्याखाली यंदाच्या यात्रा उत्सवाचे नियोजन झाले. 

दावेदारांमध्ये चुरस 
जिल्हापरिषदेच्या नियंत्रणात माळेगावा यात्रा उत्सवासाठी पाच दिवशीय उपक्रमांची शनिवारी (ता.२८) सांगता झाल्याने पुन्हा आता अध्यक्ष, उपाध्यक्षासह विषय समितीच्या पदाधिकारी निवड प्रक्रियेचे वेध लागले आहेत. दरम्यान, राज्याच्या मंत्रीमंडळ विस्तारानंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती पदाधिकऱ्यांच्या निवडी जाहिर होणार असल्याचे बोलले जात असल्याने दावेदारांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. 

राष्ट्रवादीच्या गोटात शांतता
जिल्हापरिषदेच्या एकून ६३ सदस्यांपैकी काँग्रेसचे २८ तर राष्ट्रवादीचे १० असा बहूमताचा आकडा सत्ताधारी काँग्रेसकडे असला तरी विधानसभा निवडणूकीपूर्वी राष्ट्रवादीचे जिल्हाअध्यक्ष बाप्पुसाहेब गोरठेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादीचे चार ने संख्याबळ कमी होवून ते सहा या एक अंकावर येवून ठेपले आहे. त्यातच राज्यस्तरावरील महाविकास आघाडीचा जिल्हापरिषदेतही फॉर्म्युला राबविण्यात येणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात असल्याने शिवसेनेच्या वाट्याला किती विषय समित्या ही उत्सुकता कायम आहे . पण सत्तेचा वाटा कमी होत असल्याने राष्ट्रवादीच्या गोटात कमालीची शांतता आहे.    

त्या सदस्यांच्या भुमिकेकडे लक्ष
जिल्हापरिषदेतील संख्याबळानुसार काँग्रेस २८, भाजप १३, शिवसेना दहा, राष्ट्रवादी दहा, रासप एक व अपक्ष एक असे संख्याबळ असले तरी विधानसभे पूर्वी बाप्पुसाहेब गोरठेकर यांच्या भुमिकेमुळे राष्ट्रवादीत तर खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या भुमिकेमुळे शिवसेनेच्या संख्याबळामध्ये पडझड झाली. त्यानुसार बाप्पुसाहेब गोरठेकर गटाचे चार व खासदार प्रताप पाटील गटाचे शिवसेनेतील चार सदस्य काय भुमिका घेतात ते येणाऱ्या काळात उत्सुक्याचे ठरणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com