Women Wrestler : ‘ती’ने गाजवला नांदेवलीमधील कुस्त्यांचा आखाडा; महिला मल्लांनी गाजवली स्पर्धा
Beed Wrestling Competition : खंडोबा यात्रोत्सवानिमित्त नांदेवली येथे आयोजित कुस्ती स्पर्धेत महिला कुस्तीपटूंनी उत्कृष्ट डावपेच दाखवत प्रेक्षकांची वाहवा मिळवली.
शिरूर कासार : तालुक्यातील नांदेवली येथे खंडोबा यात्रोत्सव उत्साहात पार पडला. त्यानिमित्त कुस्तीचा आखाड्याचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. महिला कुस्तीपटूंनी आपले डावपेच सादर करत प्रेक्षकांची दाद मिळविली.