file photo
file photo

‘बुलेट’वरून नर्मदा परिक्रमा !

परभणी : परभणी येथील शैलेश सुधाकरराव कुलकर्णी या तरुणाने बुलेटवरून पाच दिवस व १४ तासांत नर्मदा परिक्रमा पूर्ण करून वर्ल्ड रेकॉर्ड केले आहे. तसेच त्यांची या प्रवासाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्येही नोंद झाली आहे. त्यांच्या रेकॉर्डमुळे परभणीचे नाव देशात पोचले आहे.

परभणी शहरातील येलदरकर कॉलनीतील रहिवाशी शैलेश सुधाकरराव कुलकर्णी हे उत्तम बाईक रायडर आहेत. त्यांनी ता. एक फेब्रुवारी रोजी ‘सेव्ह वॉटर सेव्ह रिव्हर’ हा संदेश घेऊन बुलेटवरून नर्मदा परिक्रमा करण्यास परभणी शहरातून सुरवात केली. परभणी ते ओंकारेश्वर असा चार हजार ३४४ किलोमीटरचा प्रवास १६८ तासांमध्ये पूर्ण केला. ओंकारेश्वर ते ओंकारेश्वर अशी नर्मदा परिक्रमा करण्यासाठी त्यांनी सुरवात केली. यात तीन हजार २९ किलोमीटरचा प्रवास त्यांनी पाच दिवसांत पूर्ण केला. त्यांनी यासाठी १४ घंटे बुलेट प्रवास केला.
 
श्री. कोल्ही यांचा रेकॉर्ड तोडला

यापूर्वी २०१८ मध्ये नर्मदा परिक्रमा बुलेटवर करण्याचे रेकॉर्ड नितीन कोल्ही (ठाणे) यांच्या नावावर होते. ते रेकॉर्ड शैलेश कुलकर्णी यांनी तोडले आहे. श्री. कोल्ही यांनी ही नर्मदा परिक्रमा दहा दिवसांत पूर्ण केली होती. शैलेश कुलकर्णी यांनी या परिक्रमेत दोन रेकॉर्ड केले आहेत. ओंकारेश्वर ते ओंकारेश्वर हे वर्ल्ड रेकॉर्ड झालेच आहे. परंतु, परभणी ते ओंकारेश्वर हा चार हजार ३४४ किलोमीटरचा प्रवास त्यांनी १६८ तासांत पूर्ण केला. याची नोंद इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. शैलेश कुलकर्णी हे परभणी येथील सेवानिवृत्त पोलिस उपाधीक्षक एस. एम. कुलकर्णी यांचे चिरंजीव आहेत.

हेही वाचा - ‘काेरोना’चा प्रभाव : बाजारपेठ गडगडली !

यापूर्वीही दोन मोठे प्रवास बुलेटवरच
शैलेश कुलकर्णी यांनी याआधी काश्मीर ते कन्याकुमारी हा प्रवास २०१६ मध्ये पूर्ण केला आहे. त्या वेळी त्यांनी भारतीय सैन्य सन्मान यात्रा काढली होती. त्यानंतर ‘से नो युज सिंगल युज प्लॅस्टिक’ हा संदेश घेऊन भारत- नेपाळ-भुटान असा बुलेटवर प्रवास केला होता. आतापर्यंत त्यांनी तिन्ही यात्रा मिळून ६० हजार किलोमीटरचा बुलेटवरून प्रवास पूर्ण केला आहे.

कुटुंबीयांसह नितीन कोल्ही यांचा पाठिंबा
माझ्या रेकॉर्डसाठी नितीन कोल्ही यांचे मला मोठे सहकार्य मिळाले. त्यांनी मला मार्गदर्शन केले. तसेच माझे वडील एस. एम. कुलकर्णी यांच्यासह आई, पत्नी व मुलगी यांच्या पाठिंब्यामुळेच मी हे रेकॉर्ड करू शकलो.
- शैलेश कुलकर्णी, बाईक रायडर, परभणी
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com