
धाराशिव : डी-मार्टमध्ये खरेदीसाठी नागरिकांची सुरू असलेली मोठी वर्दळ, नजीकच मुलांना आणण्यासाठी शाळेसमोरून पालकांची सुरू असलेली ये-जा, अपूर्ण सेवा रस्त्यामुळे नाईलाजाने धुळे-सोलापूर महामार्गावरून चुकीच्या दिशेने येणारे वाहनचालक, महामार्ग व्यवस्थापनाने दिशादर्शक तसेच सुरक्षितेसंबंधीच्या उपाययोजना केलेल्या नसल्याने धोका पत्करून जीव मुठीत घेऊन महामार्ग ओलांडणारे नागरिक आणि त्याच क्षणी उतारावून वेगाने येणारी वाहने अशी गंभीर स्थिती शहरातून गेलेल्या धुळे-सोलापूर महामार्गावर गुरुवारी आढळून आली.