नर्सी नामदेव येथील परतवारी एकादशीची यात्रा रद्द | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

narsi namdev

नर्सी नामदेव येथील परतवारी एकादशीची यात्रा रद्द

हिंगोली: तालुक्यातील नर्सी नामदेव येथे एकादशीची परतवारी यात्रा दरवर्षी भरत असते. मात्र मागील दीड वर्षापासून कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता बुधवारी (४ ऑगस्ट) होणारी परतवारी एकादशी यात्रा रद्द झाली आहे. याबद्दलची माहिती प्रभारी तहसीलदार तथा नामदेव देवस्थानचे अध्यक्ष मधुकर खंडागळे यांनी दिली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने साथरोग प्रतिबंध कायदा मागील वर्षापासून जिल्ह्यात लागू केला आहे. जिल्ह्यात प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी कार्यक्षेत्रात उपाययोजना म्हणून संत नामदेव महाराज यांची बुधवारी होणारी परतवारी एकादशीची यात्रा रद्द केली आहे. भाविकांनी मंदिर परिसरात दर्शनासाठी येऊन गर्दी करू नये, असे आवाहन देवस्थान प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

तालुक्यातील नर्सी नामदेव येथे आषाढी एकादशी नंतर येणाऱ्या एकादशीला परतवारीची मोठी यात्रा भरते. लाखो भाविक येथे संत नामदेव महाराज यांच्या दर्शनासाठी येतात. ही अनेक वर्षांपासून चालत आलेली पंरपरा आहे. मात्र मागच्या वर्षीपासून कोरोनाचे संकट सुरू असल्याने कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी मंदिरे बंद आहेत. त्यात यात्रा उत्सव यावर देखील बंदी आहे. दरम्यान, राज्य शासनाने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा निर्गमित केलेला आहे .

हेही वाचा: Corona Vaccination: औरंगाबाद शहरात केवळ १४.५५ टक्के लसीकरण!

जिल्हाधिकारी हे त्यांचे कार्यक्षेत्रात कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी व त्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करतात. त्यासाठी संत नामदेव महाराजांची परतवारी एकादशीच्या दिवशी होणारी यात्रा रद्द करण्यात आली असल्याचे प्रसिद्ध पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. उत्सवामध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्तींना, भाविकांना सदर कालावधीत संस्थानच्या परिसरामध्ये दर्शनाकरिता येऊन गर्दी करू नये असे संस्थानचे अध्यक्ष तथा तहसिलदार यांनी कळविले आहे.

Web Title: Narsi Namdev Yatra Hingoli Cancelled Due To Corona Restrictions

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..