पैठण - येथील जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागरात नासिक येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदी दूधडी भरून वाहत आहे. त्यामुळे नाथसागर धरणाचा पाणीसाठा वाढत असुन आता हे धरण अर्धे भरले आहे. धरणाचा पाणीसाठा ५२.३६ टक्के झाला आहे..धरणाची पाणी पातळी १५१२.००असुन मीटरमध्ये ४६०.८५८ आहे. एकुण पाणी साठा १८७४.८५५ दश लक्ष घन मीटर तर जिवंत पाणीसाठा ११३६.७४९ दश लक्ष घन मीटर आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक २४ हजार १९२ क्युसेक आहे. अशी माहिती धरण शाखा अभियंता मंगेश शेलार यांनी दिली..नासिक जिल्ह्यात जुन महिन्यात मुसळधार पाऊस झाला असल्याने नाथसागर धरणाची पाणी पातळी वाढण्यास सुरुवात झाली. पावसाळा सुरु होण्याअगोदर धरणात २९ टक्के पाणी साठा होता. या पाणी साठ्यात सुरुवातीला हळुहळू पाणी येण्यास सुरुवात झाली. परंतु यानंतर नासिक येथे गोदावरीला पुर आल्यानंतर पाणी पातळी वेगाने वाढु लागली..त्यामुळे अखेर हा पाणी साठा ५० टक्याहुन अधिक वाढला असुन यामुळे धरण पावसाळ्याच्या जुलै या दुसऱ्या महिन्यातच अर्धे भरले आहे. दरम्यान नाथसागर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असणारी २२ धरणे ही भरली आहे. त्यामुळे या धरणातुन ही पाणी मोठ्या प्रमाणात नाथसागर धरणात पाणी येण्यास सुरुवात झाली आहे..पुर नियंत्रण विभागाची स्थापनाधरणाच्या पाणी साठ्यात वाढ होत असल्याने धरण कार्यकारी अभियंता प्रशांत संत यांनी पुर नियंत्रण विभागाची स्थापना केली आहे. त्यात धरण उप अभियंता श्रध्दा निंबाळकर, धरण कनिष्ठ अभियंता मंगेश शेलार, रितेश भोजने, कनिष्ठ अभियंता बी.के.सातपुते, एस.जी कुरलिये, एस.जी . शिरसाट, सहायक गणेश खराडकर, यु. एस. मिसाळ, श्रीमती प्राजक्ता मेसे, एस. आर. जिवडे, संजय चव्हाण आबासाहेब गरुड, अप्पासाहेब तुदारे, शशीकांत डमाळे यांचा समावेश आहे. हा पुर नियंत्रण विभाग परिस्थितीवर विशेष लक्ष ठेवून आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.