

National Bird Peacock Brutally Killed in Paithan: Two Youth Arrested
Sakal
रविंद्र गायकवाड
बिडकीन : पैठण तालुक्यातील चितेगाव–बोकुड जळगाव रोडलगत पांगरा शिवारात गट क्रमांक १० मध्ये अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. दोन तरुणांनी भारताचा राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराला पकडून त्याच्या डोक्यात काठी मारत निर्घृणपणे ठार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. हि घटना आज ता. २३ रोजी दुपारच्या वेळी घडली आहे.