
बीड - मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन हत्या प्रकरणात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानेही दखल घेतली असून आयोगाने स्वतंत्र गुन्हा नोंद करुन घेतल्याची माहिती, खासदार बजरंग सोनवणे यांनी दिली. तपास यंत्रणांसह आता मानवाधिकार आयोग देखील या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करणार आहे.