Manwat Health Services Review: सुट्टीच्या दिवशी आरोग्य सुविधांची तपासणी; महालक्ष्मी सणात महिला कर्मचाऱ्यांची ड्युटीमुळे तारांबळ

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान आयुक्तांचा मानवत दौरा; ग्रामीण रुग्णालय, अर्बन हेल्थ सेंटरची पाहणी, सुविधा व मनुष्यबळाबाबत अधिकाऱ्यांना सूचना
Inspection of Health Facilities by NHM Commissioner

Inspection of Health Facilities by NHM Commissioner

Sakal

Updated on

मानवत : राज्य शासनाच्या राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान आयुक्त तथा अभियान संचालक डॉ. सुनील भोकरे यांनी मानवत येथे भेट देत ग्रामीण रुग्णालय, नागरी आरोग्य केंद्रे आणि विविध आरोग्य विभागांच्या कामकाजाची पाहणी केली. मात्र या दौऱ्याची चर्चा आरोग्य सुविधांच्या आढाव्याबरोबरच सुट्टीच्या दिवशी झालेल्या तपासणीमुळेही रंगली. महालक्ष्मी सणाच्या तयारीत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांना अचानक ड्युटीवर हजर राहावे लागल्याने त्यांची मोठी तारांबळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com