हिंगोलीत पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन

राजेश दारव्हेकर
Monday, 11 January 2021

देशात पेट्रोल, डिझेल, गॅसचे भाव अतिशय जलद गतीने वाढत आहेत. याला सध्या असलेले केंद्र सरकार जवाबदार आहे. प्रत्येक दिवशी होत असलेली दरवाढ यामुळे नागरिक कंटाळून गेले आहेत.

हिंगोली : येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे पेट्रोल- डिझेल गॅस दरवाढीच्या निषेर्धात केंद्र सरकार विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे सोमवारी ( ता. ११ )  आंदोलन करण्यात आले.

देशात पेट्रोल, डिझेल, गॅसचे भाव अतिशय जलद गतीने वाढत आहेत. याला सध्या असलेले केंद्र सरकार जवाबदार आहे. प्रत्येक दिवशी होत असलेली दरवाढ यामुळे नागरिक कंटाळून गेले आहेत. केंद्र सरकारच्या विरोधात जनतेत रोष पसरला आहे.

त्यामुळे या भाजप सरकारच्या व नरेंद्र मोदींच्या विरोधात हिंगोली येथील गांधी चौकात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत आंदोलन केले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 

हेही वाचा खळबळजनक, पाच हजार कोंबड्या मारण्याचे आदेश 

या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मनीष आखरे, तालुकाध्यक्ष माधव कोरडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष बालाजी घुगे, प्रदेश सचिव जावेदराज, अमित काळासरे, मनोज बांगर, कमलेश यादव, पंकज पैठणे, राजू घुगे, अविनाश बांगर, अशोक पाटील, ऋषिकेश शहाणे, सुरज बांगर, वैजनाथ घोषीर, साई शिंदे, रवि घुगे, संतोष बांगर, रवी बांगर, आकाश बांगर, बजरंग घुगे, ओम बांगर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादन - प्रल्हाद कांबळे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nationalist Youth Congress agitation against petrol and diesel price hike in Hingoli