

Natural Cooling: Traditional Clay Pots Dominate Pachod Weekly Market
Sakal
पाचोड : उन्हाच्या तिव्रतेसोबत पिण्यासाठी थंड पाण्याची अपेक्षाही जोर धरू लागली, पिण्याच्या पाण्यापासून होणारे विविध आजार टाळण्यासाठी 'वॉटर फिल्टर' सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार मोठ्या प्रमाणात होत असला, तरी ग्रामीण भागातील घराघरांत मातीच्या माठांना आजही विशेष मागणी असल्याचे चित्र पाचोड (ता.पैठण) च्या आठवडे बाजारासह सर्वत्र पाहवयास मिळते.