Nature News : सुगरणींच्या घरट्यांची यंदा घटली संख्या

टेंभुर्णी जोरदार पाऊस नसल्याचा परिणाम
sugran
sugran sakal

टेंभुर्णी - सुगरणीचे घरटे म्हणजे निसर्गातील उत्कृष्ट कारागिरीचा नमुना. इवल्याश्‍या चोचीने झाडांवर गवतांच्या काड्यांपासून विणलेले घरटे सहज लक्ष वेधून घेते. यंदा मात्र पावसाने दगा दिल्याने त्याचा परिणाम मनुष्याप्रमाणे निसर्गातील अन्य जीवांवरही होताना दिसत आहे. यंदा सुगरणीच्या घरट्यांची संख्या कमालीची घटली आहे.

नर सुगरण पक्ष्यांकडून जून ते ऑगस्ट या महिन्यात घरटे विणण्याची लगबग सुरू असते. सुगरण पक्ष्याकडून गवतांच्या काड्याद्वारे केले जाणारी घरट्याची विणकामाची कलात्मकता पाहताना मनाला भुरळ पडल्याशिवाय राहत नाही. जून महिन्यातच नरपक्षी घरटे तयार करतात. यात एक पक्षी तीन ते चार घरट्यांची निर्मिती करतो.

मादी सुगरण पक्ष्याला ते घरटे दाखवितात. यातील जे घरटे मादीला आवडेल त्या घरट्याचे काम दोघे मिळून पूर्ण करतात. सुरईच्या आकाराचे घरटे तयार करून त्यात अंडी दिली जातात.

हे घरटे तयार करण्यासाठी गवताच्या व शिंदीच्या नरम, बारीक काड्यांचा वापर केला जातो. परंतु यंदा पावसाळा कमी असल्याने घरटे बनवण्यासाठी लागणारे गवत काडी अत्यल्प प्रमाणात उपलब्ध आहे. याशिवाय सुगरण पक्ष्याच्या विणीचा हंगाम वाढीस लागण्यासाठी वातावरणात गारवा आवश्यक असतो. परंतु सद्यस्थितीत तापमानात वाढ झालेली असल्याने व पावसाळा कमी असल्याने घरटे तयार करण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे.

यावर्षी पावसाळा कमी प्रमाणात झाल्यामुळे सुगरण पक्ष्यांचा विणीचा हंगाम लांबला आणि त्यामुळे त्यांचे घरटे बांधण्याचे प्रमाण कमी झाले आहे. या पक्ष्याचे वैशिष्ट्य म्हणजे सुगरण नर पक्षी घरटी बांधतो, मादी नव्हे. मादीला जर नराने बांधलेले घर आवडले तरच ती त्याच्यासोबत सहवास करते. दोघे मिळून पिल्लांचे पालन पोषण करतात.

ज्ञानेश्वर गिराम, पक्षी तज्ज्ञ, जालना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com