

Dilapidated ZP School in Naveen Tamlur Poses Threat to Students' Lives
Sakal
देगलूर : तालुक्यातील नवीन तमलूर येथील नूतन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या ५ वी ते ७ वीच्या वर्गखोल्या अत्यंत धोकादायक अवस्थेत पोहोचल्या असून, येणाऱ्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. इमारतीच्या भिंतींना मोठे तडे गेले असून छताची अवस्था देखील जीर्ण झाल्याने कोणत्याही क्षणी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून येत्या शैक्षणिक वर्षापूर्वी विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावे, अशी मागणी ग्रामस्थ व पालकांकडून जोर धरत आहे.