Beed SP Navneet Kanwat : बीड भयमुक्त करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करणार; नूतन पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत
Beed News : बीडचे नवनियुक्त पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी कायदा सर्वांसाठी समान आहे, असे सांगत कायदा मोडणाऱ्यांवर कडक कारवाईची चेतावणी दिली. मस्साजोग येथील सरपंच हत्येच्या तपासात लवकरच आरोपींना गजाआड करण्यात येईल, असे ते म्हणाले.
बीड : कायदा सर्वांसाठी समान आहे. त्यामुळे सर्वांनी नियमाचे, कायद्याचे पालन करणे आवश्यक आहे. कायदा मोडणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. मग त्यामध्ये पोलिस प्रशासनातील लोक असले तरी कारवाई होईल.