काय सांगता! सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी नवरदेवाची उंटावरून वरात

रामदास साबळे
Thursday, 4 March 2021

या आगळ्या-वेगळ्या पद्धतीने निघालेली वरातीकडे उपस्थित वऱ्हाडी मोठ्या कुतूहलाने पाहत होते

केज (बीड): कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मित्रांपासून सोशल डिस्टन्स ठेवण्यासाठी नवरदेवांची वरात पारंपारिक पद्धतीने घोड्यावरून काढण्याऐवजी चक्क उंटावर बसून काढण्यात आली. त्यामुळे वऱ्हाडी मंडळीत चांगलीच चर्चा रंगल्याचे दिसून आले.

तालुक्यातील साळेगाव येथील माजी सैनिकाच्या मुलाचा विवाह नुकताच खामसवाडी येथील कन्या ऐश्वर्या हिच्याशी संपन्न झाला. मात्र  वराचे आई-वडील, नातेवाईक व मित्रांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम व गर्दी पाळत नवरदेवाचा वरातीत इतरांचा संपर्क येऊ नये, यासाठी घोड्यावर न काढता चक्क उंटावर बसून वरात काढली. यामुळे कोरोनाकाळात तालुक्यातून उंटावरून मुलांची वरात काढणारे वरपे कुटूंब एकमेव ठरले आहे.

Coronavirus: मास्कवरून नागरिक घालतायत पालिका कर्मचाऱ्यांशी हुज्जत; दंड देण्यास...

या आगळ्या-वेगळ्या पद्धतीने निघालेली वरातीकडे उपस्थित वऱ्हाडी मोठ्या कुतूहलाने पाहत होते. वधू-वरांच्या आई-वडीलांनी त्यांच्या नातेवाईक व निमंत्रितांना कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन होऊ नये. यासाठी प्रत्यक्ष लग्नाला हजर न राहाता भ्रमणध्वनीवरून शुभेच्छा दिल्या तरी चालतील, अशी विनंती केल्याने नवं वधूवरांनी आलेल्या शुभेच्छांचा स्वीकार केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navradev varat on camel rides to follow social distance corona virus covid 19