esakal | तुळजापुरात तुळजाभवानी मातेच्या मंदिरात उत्साहात घटस्थापना | Navratri Ustav In Tuljabhavani Mata Temple
sakal

बोलून बातमी शोधा

तुळजापूर (जि.उस्मानाबाद) : तुळजाभवानी माता मंदिरात गुरूवारी (ता.सात) घटस्थापना करण्यात आली.

तुळजापुरात तुळजाभवानी मातेच्या मंदिरात उत्साहात घटस्थापना

sakal_logo
By
जगदीश कुलकर्णी

तुळजापूर (जि.उस्मानाबाद) : तुळजाभवानी माता मंदिरात गुरूवारी (ता.सात) घटस्थापना करण्यात आली. तुळजाभवानी मातेची शेजघरातील निद्रिस्त मूर्ती पहाटे सिंहासनावर अधिष्ठीत झाली. त्यानंर मातेचे अभिषेक झाले. सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी तथा तुळजा भवानी मंदिर समितीचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगांवकर यांच्या हस्ते कलशाची मिरवणूक गोमुख तिर्थ कुंडापासून निघाली. तुळजाभवानी मंदिरात घटस्थापना परंपरेने करण्यात आली. त्यानंतर उपदैवत असणाऱ्या येमाई मंदिर आणि खंडोबा मंदिरात घटस्थापना झाली. त्यानंतर जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगांवकर यांनी ब्राह्मणांना वर्णी दिली. वेदपठणात गणेशपूजन, वरूण पूजन करण्यात आले. प्रारंभी तुळजाभवानी मातेचे घटे संजय घटे यांच्यासह सर्व ऋत्विजांना वर्णी देण्यात आली. यावेळी हैदराबादच्या राजा रावबहाद्दूर संस्थानचे उपाध्ये प्रशांत कोंडो, कला कोंडो तसेच छत्रपती संस्थानच्या वतीने प्रतिपचंद्र प्रयाग, मंदा प्रयाग यांनी त्यांच्या होमाची वर्णी दिली. तुळजाभवानी मातेची पुजा भोपे पुजारी सुरेश साहेबराव कदम परमेश्वर यांनी केली. यावेळी महंत तुकोजी बुवा, महंत चिलोजी बुवा, महंत वाकोजी बुवा, महंत हमरोजी बुवा, उपविभागीय अधिकारी योगेश खरमटे, आमदार राणाजगजितसिंह पाटील, नगराध्यक्ष सचिन रोचकरी, भोपे मंडळाचे अध्यक्ष अमर परमेश्वर, पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जनराव साळुंके, उपाध्ये मंडळाचे अध्यक्ष अनंत कोंडो, तुळजाभवानी मंदिर समितीच्या सरव्यवस्थापिका योगिता कोल्हे, धार्मिक व्यवस्थापक सिद्देश्वर इंतुले, तुळजाभवानी मातेचे उपाध्ये सुनित पाठक, ऋषिकेश दादेगांवकर धनेश्वर, मकरंद प्रयाग, महेश उर्फ राजू प्रयाग, राजन पाठक, गजानन लसणे, धनंजय पाठक, श्रीराम अपसिंगेकर, अॅड शिरीष कुलकर्णी, पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे आदी उपस्थित होते.

फोटो ओळी तुळजा भवानी मातेची सालंकृत मूर्ती.

loading image
go to top