esakal | एकदा शब्द टाकला असता तर मतदारसंघ सोडला असता : धनंजय मुंडे (Video)
sakal

बोलून बातमी शोधा

Dhananjay Munde

माझ्यावर अगदी खालच्या पातळीवर जाऊन टीका करण्यात येत आहे. मी नाते जपणारा माणूस आहे. मी असे बोललो असेल तर स्वतःला संवपून घेईल. मला चिंता माझी स्वतःची आहे, घरातील प्रत्येक नात्याची आहे. मला या नात्यांमध्ये बदनाम केले जात आहे.

एकदा शब्द टाकला असता तर मतदारसंघ सोडला असता : धनंजय मुंडे (Video)

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बीड : पंकजांकडून माझ्यावर अनेकवेळा शब्दप्रहार करण्यात आला. पण, मी कधीही वाईट शब्द बोललेला नाही. मी बहिणीचे नाते मानणारा आहे. मला एकदा शब्द टाकला असता तर मी मतदारसंघ सोडला असता, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी सांगितले.

सलग दोन-तीन तास भाषण करणे सोपे नाही. त्यामुळे ताण येतोच, अशातून भोवळ येण्यासारख्या घटना घडू शकतात. असे सांगत धनंजय मुंडे यांना अश्रू अनावर झाले. एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन मी राजकारण करणारा नाही, असेही त्यांनी सांगितले. भाजप महायुतीच्या उमेदवार आणि राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याबाबत भाषणातून असभ्य टिपण्णी केल्याच्या आरोपावरून धनंजय मुंडे यांच्या विरोधात शनिवारी (ता. 19) रात्री उशिरा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विडा (ता. केज) येथील प्रचार सभेत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्या विरुद्ध बोलताना काही आक्षेपार्ह शब्द वापरल्याचे सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत ऐकायला येतात. त्यावरून स्पष्टीकरण देताना धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत व्हिडिओत छेडछाड करण्यात आल्याचे म्हटले आहे.

मुंडे म्हणाले, की माझ्यावर अगदी खालच्या पातळीवर जाऊन टीका करण्यात येत आहे. मी नाते जपणारा माणूस आहे. मी असे बोललो असेल तर स्वतःला संवपून घेईल. मला चिंता माझी स्वतःची आहे, घरातील प्रत्येक नात्याची आहे. मला या नात्यांमध्ये बदनाम केले जात आहे. मला सांगायचे निवडणूक लढवू नको म्हणून, नसतो लढलो. नवीन आलेल्या भावाचे हे कारस्थान आहे.