esakal | परळी : विजयानंतर धनंजय मुंडे यांनी दिली प्रतिक्रिया म्हणाले...
sakal

बोलून बातमी शोधा

परळी : विजयानंतर धनंजय मुंडे यांनी दिली प्रतिक्रिया म्हणाले...

जनतेच्या जोरावर विजयी

परळी : विजयानंतर धनंजय मुंडे यांनी दिली प्रतिक्रिया म्हणाले...

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

परळी : परळी विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी पूर्ण झाली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय मुंडे यांचा विजय झाला. तर त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. त्यावर आता धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ''जनतेने मला वाचवलं आणि मला नायक केलं. जो कौल दिला त्याचे मी पालन करणार आहे'', असे ते म्हणाले.

धनंजय मुंडे म्हणाले, विकासाच्या मुद्दावर एकटा लढत होतो. परळीतील जनतेने जो कौल दिला तो मनापासून कायम राहील. स्वर्गीय मुंडे साहेबांची आठवण राहिल्याशिवाय राहणार नाही. निवडणुकीत सर्वांनी परिश्रम घेतले. माझ्या सर्व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले म्हणून हा विजय मला प्राप्त झाला. सोपं की अवघड हा विषय नव्हता. या निवडणुकीत खालच्या पातळीवर जाऊन राजकारण केलं गेलं. मायबाप जनतेने माझा न्याय केला आणि मला निवडून दिले. जनतेनेच हाणून पाडला. जनतेने मला वाचवलं आणि मला नायक केले. जो कौल दिला त्याचे मी पालन करणार आहे.

जनतेच्या जोरावर विजयी : राजश्री मुंडे

ही वैचारिक निवडणूक आहे. विकासाचा मुद्दा घेऊन निवडणूक लढवली आहे. परळीकरांनी साहेबांना निवडून दिले आहे. त्यांचा हा विजय जनतेच्या जोरावर आहे, अशा शब्दांत धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली.