...तर अण्णा तुमचे कपडे फाडू; संदीप क्षीरसागर यांचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रेची सभा रविवारी (ता. २५) रात्री बीडमध्ये झाली. नुकतेच शिवसेनेत जाऊन मंत्री झालेल्या जयदत्त क्षीरसागर यांच्यावर जोरदार टोलेबाजी केली. ७५ व्या वर्षी धनुष्यबाण उचलला तर बरगड्या मोडतील. बीड शहरातील अनेक जमिनी दोन्ही भावांनी हडपल्याचा आरोप करत संस्था, दारु दुकान आणि रॉकेलचे लायसन्स यांच्याच नावावर असल्याचेही संदीप क्षीरसागर म्हणाले.

बीड : जयदत्त क्षीरसागर यांनी मंत्रीपद घेण्यासाठी ५० कोटी रुपये दिल्याचा गंभीर आरोप करत येवढे पैसे मतदार संघात खर्च केले असते तर विकास झाला असता असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते संदीप क्षीरसागर यांनी केले. सामाजिक व्यासपीठावर भाषणे केली तर कपडे फाडू असा इशाराही त्यांनी काका जयदत्त क्षीरसागर यांना दिला. 

राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रेची सभा रविवारी (ता. २५) रात्री बीडमध्ये झाली. नुकतेच शिवसेनेत जाऊन मंत्री झालेल्या जयदत्त क्षीरसागर यांच्यावर जोरदार टोलेबाजी केली. ७५ व्या वर्षी धनुष्यबाण उचलला तर बरगड्या मोडतील. बीड शहरातील अनेक जमिनी दोन्ही भावांनी हडपल्याचा आरोप करत संस्था, दारु दुकान आणि रॉकेलचे लायसन्स यांच्याच नावावर असल्याचेही संदीप क्षीरसागर म्हणाले.

आमच्या नावावर अडीच कोटी रुपयांचे कर्ज काढल्याचा गंभीर आरोप करत एवढे करुनही आरोप झाल्याचा काका (जयदत्त क्षीरसागर) यांचा दावा धांदट खोटा असल्याचेही ते म्हणाले. त्यांच्यासमोर आपण खुल्या व्यासपीठार कधीही वन - टू - वन यायला तयार असुन तशी वेळ आली तर त्यांचे कपडे फाडू असे आव्हानही संदीप क्षीरसागर यांनी दिले. 

संदीप क्षीरसागर आणि जयदत्त क्षीरसागर यांचे राजकीय वैमनस्य जिल्ह्याला नवे नाही. काका आणि पुतण्यामधले हे भांडण जिल्ह्यात गेले काही दिवस जोरात सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संदीप क्षीरसागर यांना मिळत असलेले वाढते महत्व लक्षात घेऊन जयदत्त अण्णा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा त्याग केला होता. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला, शिवसेनेने त्यांना कॅबिनेट दर्जाचे मंत्रिपद देऊन त्यांचा सन्मान केला. त्यानंतर काका पुतण्यामधील राजकीय वैर अधिकच चिघळले. आथा संदीप यांनी असा आरोप केल्याने जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP leader Sandip Kshirsagar attacks Jaydatta Kshirsagar in Beed