औसा - विधानसभेची निवडणूक होऊन अवघे वीस दिवसही उलटले नाहीत तोपर्यंत भाजपा सोबत सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने औशात 'भाजपा हटाव औसा शहर बचाव'चा नारा देत भाजपाला म्हणजेच आमदार अभिमन्यू पवारांना डिवचले आहे. आमदार अभिमन्यू पवारांच्या नेतृत्वाखाली शहरात काम करीत असलेल्या भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकारी येथील नागरी समस्या सोडविण्यात अपयशी ठरल्याचा राष्ट्रवादीचा आरोप आहे.