
वडिगोद्री : विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या हायवाने समोरून येणाऱ्या कारला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात परप्रांतीय दांपत्य जागीच ठार झाले. तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री ११:३० च्या दरम्यान धुळे सोलापूर महामार्गावरील बारसवाडा फाटा येथे घडली. हा अपघात एवढा भीषण होता की जेसीबीच्या सहाय्याने मृतदेह बाहेर काढण्यात आले.