दुय्यम निबंधक कार्यालयाजवळ वाहनतळाची गरज

योगेश बरीदे)
सोमवार, 18 जून 2018

परतूर : दुय्यम निबंधक कार्यालया समोर वाहनतळ नसल्याने शहरातील एकमेव मुख्य रस्त्यावर वाहतुकीचा मोठा खोळंबा निर्माण झाला आहे. यामुळे शालेय विद्यार्थी, रुग्ण, ज्येष्ठ नागरींक यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. परतूर शहरात सध्या मुख्य रस्त्याचे सिमेंट काँक्रेटीकरणाचे काम चालू आहे. यामुळे पूर्ण मुख्य रस्त्यावरच थोड्याफार प्रमाणात वाहतुकीचा खोळंबा निर्माण होत असतो. पण रस्त्यावरील दुय्यम निबंधक कार्यालयासमोर सर्वात जास्त वाहतूक खोळंबते.

त्याचे कारण म्हणजे या कार्यालयासमोर वाहनतळ नाही. या परिसरात सतोनकर रुग्णालय, योगानंद माध्यमिक विद्यालय, जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, स्वामी विवेकानंद विद्यालय व मोठी बाजार पेठ आहे. शाळा सुटण्याच्या वेळी मोठी गर्दी या कार्यालय समोर असते. वाहने उभी असल्याने या ठिकाणाहून वाहन काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. यामुळे या ठिकाणी गाडी काढण्याचा मुद्यावर अनेकदा वाद होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत देखील झाले आहे. छोटे मोठे अपघात देखील याठिकाणी घडत आहे. सर्वच स्तरातून हे कार्यलयात इतर ठिकाणी हलवण्याची मागणी होत आहे.

कार्यालयाची जागा दस्तऐवज साठी धोख्याचीच
मुख्य रस्त्याची उंची दीड ते दोन फूट वाढवल्याने हे कार्यालय रस्त्यापेक्षा खूप खाली गेले आहे. याचा परिणाम म्हणजे पावसाचे पाणी सरळ कार्यालयात शिरत आहे. मागील (ता8) परतूर शहरात 59 मी.मी. पाऊस झाला यावेळी या कार्यालयात पाणी शिरले पण अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे कोणतीही कागद पत्रे भिजली नाही. 

Web Title: Need of parking near the secondary registrar office