होम आयसोलेशनमधील रुग्णांवर लक्ष देण्याची गरज; ठरु शकतात सुपर स्प्रेडर, घरावर परत बोर्ड लावण्याची मागणी

file photo
file photo

परभणी ः परभणी जिल्ह्यात कोरोनाचा आता उद्रेक झाला आहे. जिल्ह्यात शुक्रवारी (ता. नऊ) रोजी घेतलेल्या नोंदी प्रमाणे जिल्ह्यात तब्बल 4 हजार 223 रुग्ण कोरोनाबाधीत आहेत. त्यापैकी तीन हजार 199 रुग्ण होम आयसोलेशन मध्ये उपचार घेत आहेत. ज्यांना कसलेही लक्षणे नाहीत परंतू ते कोरोना पॉझिटीव्ह आहेत अश्या रुग्णावर महापालिकेला आता लक्ष ठेवण्याची गरज आहे. कारण असे रुग्ण बाहेर फिरत असण्याची दाट शक्यता असल्याने ते सुपर स्प्रेडर तर ठरणार नाहीत ना ? अशी शक्यता वर्तविली जात आहे.

परभणी जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेदिवस वाढत जात आहे. दररोज कोरोना पॉझिटीव्ह निघणाऱ्यांची संख्या 500 च्याही पुढे सरकली आहे. त्यात मरण पावणाऱ्यांची संख्याही या महिण्यात जरा जास्त झाली आहे. त्यामुळे जिल्हा कोरोनाचा हाहाकार उडाला आहे. उपलब्ध खाटांच्या संख्येपेक्षाही जास्त रुग्ण पॉझिटीव्ह निघाल्याने अनेकांना होम आयसोलेशन मध्ये राहून उपचार करण्याचा सल्ला दिला जात आहे.  शुक्रवारी (ता. नऊ) रात्री परभणी जिल्ह्याचा कोरोना अहवाल जिल्हा रुग्णालयाच्यावतीने प्रसिध्द करण्यात आला. त्यात 842 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे सध्या चार हजारांच्या पेक्षाही जास्त रुग्ण उपचार घेत आहेत. त्यातील तीन हजार 199 रुग्ण शुक्रवारपर्यंत घरी उपचार घेत आहेत. परंतू घरी राहूण उपचार घेणाऱ्या लक्षणे नसणाऱ्या रुग्णांवर कुणाचेही नियंत्रण नसल्याने ते शहरात फिरून कोरोना प्रसाराचे काम तर करत नसावेत अशी शंका सर्वसामान्य नागरीकांतून व्यक्त होत आहे. त्यामुळे या रुग्णावर नियंत्रण आणण्याचे काम महापालिकेच्या आरोग्य विभागाला हाती घ्यावे लागणार आहे.

रुग्णांच्या घरावर महापालिकेचे बॅनर आवश्यक

ज्या घरात कोरोना बाधित रुग्ण होम आयसोलेशन मध्ये उपचार घेत आहेत. अश्या रुग्णांच्या घराबाहेर महापालिकेने प्रतिबंधित क्षेत्र म्हणून सुचना फलक बसविण्याची गरज आहे. काही ठिकाणी असे फलक लावण्यात आले असले तरी अनेक घरावरील असे फलक गायब झाल्याचे दिसत आहेत.

सार्वजनिक ठिकाणी सॅनिटाझरची गरज

गतवर्षी कोरोनाचा प्रसार सुरु झाल्यानंतर महापालिकेच्यावतीने ठिक- ठिकाणी व कॉलन्यातून तसेच बाजारपेठेतील सार्वजनिक ठिकाणी सॅनिटायझेशन केले जात असे. त्या काळात कोरोनाचा तेवढ्या मोठ्या प्रमाणात प्रसार झालेला नव्हता. परंतू आता शहरात कोरोनाचे अनेक रुग्ण असल्याने किंवा त्यांच्या संपर्कातील व्यक्ती बाजारात येत असल्याने सार्वजनिक ठिकाणांचे सॅनिटायझेशन करणे परत सुरु करण्याची मागणी होत आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com