NEET Coaching Center Scandal: पवार, खाटोकरला न्यायालयीन कोठडी; बीडमधील अल्पवयीन विद्यार्थिनीच्या लैंगिक छळाचे प्रकरण
Beed News: बीडमधील नीट कोचिंग क्लासमधील अल्पवयीन विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार आणि प्रशांत खाटोकर यांना न्यायालयाने १४ दिवसांची कोठडी सुनावली.
बीड : नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा वर्षभर लैंगिक छळ प्रकरणातील आरोपी विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या आरोपींना शनिवारी (ता. पाच) न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. २९ जूनपासून दोघे पोलिस कोठडीत होते.