Maharashtra Board : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी व बारावीच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी नवीन अॅड्रॉइड ॲप विकसित केले आहे. या ॲपद्वारे विद्यार्थी, पालक आणि शालेय कर्मचाऱ्यांना परीक्षेची माहिती मिळवता येईल.
उमरगा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षेला बसलेल्या परीक्षार्थींना घरबसल्या अद्ययावत माहिती मिळावी म्हणून राज्य शिक्षण मंडळाद्वारे नवे अॅप विकसित करण्यात आले आहे.