हिंगोली जिल्ह्यात कोरोनाचा नवीन एक रुग्ण; तर 07 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज, 30 रुग्णांवर उपचार सुरु

राजेश दारव्हेकर 
Tuesday, 17 November 2020

जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण तीन हजार 246 रुग्ण झाले असून, त्यापैकी तीन हजार 165 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

हिंगोली : जिल्ह्यात एक नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपीड अँटीजन टेस्टद्वारे कळमनुरी परिसरात एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आला आहे. तर आज दोन कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी सात रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजन सुरू आहे. तर कोव्हिड-19 रुग्णाची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यास बायपप मशीनवर ठेवण्यात आले आहे. असे एकूण आठ रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
 
जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण तीन हजार 246 रुग्ण झाले असून, त्यापैकी तीन हजार 165 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 30 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 51 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A new corona patient has been found in Hingoli district

Tags
टॉपिकस
Topic Tags: