Electric Shock
sakal
कन्नड - लग्नाची मेहंदी अजून सुकलीही नव्हती, तोच एका दुर्दैवी घटनेने नवविवाहितेचा संसार फुलण्यापूर्वीच उध्वस्त झाला. विद्युत मोटार चालू करत असताना अचानक लागलेल्या जोरदार विजेच्या धक्क्याने (शॉक) १८ वर्षीय नवविवाहितेचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना तालुक्यातील गराडा येथे मंगळवारी (ता. २६) सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे माहेर आणि सासर अशा दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.