esakal | अपघातातील जखमीचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

विनोद बोडके

अपघातात गंभीर जखमी झालेल्या विनोद बोडके या युवकाचा सोलापूर येथे उपचारादरम्यान रविवारी (ता. एक) मृत्यू झाला.

अपघातातील जखमीचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जेवळी (उस्मानाबाद) ः येथील बेन्नीतुरा नदीच्या पुलावर मालवाहतूक टेंपो व दुचाकीचा मंगळवारी (ता. 27) अपघात झाला होता. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या विनोद बोडके या युवकाचा सोलापूर येथे उपचारादरम्यान रविवारी (ता. एक) मृत्यू झाला.


याबाबत अधिक माहिती अशी, की वडगाववाडी (ता. लोहारा) येथील विनोद प्रभाकर बोडके (वय 21) हा युवक मंगळवारी (ता. 27) मित्राबरोबर दुचाकीने (एमएच-14, बीएच-4453) आयुर्वेदिक औषध आणण्यासाठी अचलेरकडे जात होता. या वेळी जेवळी येथील राजमार्गावरील बेन्नीतुरा नदीच्या पुलावर जळकोटवरून लोहाराकडे जाणाऱ्या भरधाव मालवाहतूक टेंपोने (एमएच-25, एजे-0604) दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात विनोद बोडके याच्या डोक्‍याला दुखापत झाल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर सोलापूर येथील एका रुग्णालयात उपचार सुरू होते.

गेल्या सहा दिवसांपासून विनोदची मृत्यूशी सुरू असलेली झुंज रविवारी थांबली. रविवारी रात्री नऊच्या सुमारास उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. विनोद लोहारा येथील महाविद्यालयात शिक्षण घेत होता. त्याच्या मागे आई-वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. या घटनेमुळे वडगाववाडी गावावर शोककळा पसरली आहे. 

loading image
go to top