esakal | रडत बसलेल्या मुलास पोलिसांचे मिळाले "प्रेम'
sakal

बोलून बातमी शोधा

कळंब ः घरचा रस्ता चुकलेल्या प्रेम गायकवाड याला पालकांच्या ताब्यात देताना पोलिस उपनिरीक्षक सी. एस. गुसिंगे, महिला पोलिस कर्मचारी श्रीमती आर. एन. काळे.

घरचा रस्ता चुकलेल्या चिमुकल्याला येथील पोलिसांनी केवळ पाच तासांत पालकांच्या ताब्यात दिले. सोशल मीडियाचा योग्य वापर केल्यास अनेक चांगल्या गोष्टी घडू शकतात, याचा प्रत्यय कळंब पोलिस ठाण्यात शनिवारी (ता. 24) आला. 

रडत बसलेल्या मुलास पोलिसांचे मिळाले "प्रेम'

sakal_logo
By
दिलीप गंभीरे

कळंब (जि. उस्मानाबाद) ः घरचा रस्ता चुकलेल्या चिमुकल्याला येथील पोलिसांनी केवळ पाच तासांत पालकांच्या ताब्यात दिले. सोशल मीडियाचा योग्य वापर केल्यास अनेक चांगल्या गोष्टी घडू शकतात, याचा प्रत्यय कळंब पोलिस ठाण्यात शनिवारी (ता. 24) आला. 


शहरातील कल्पनानगर भागातील प्रेम हरी गायकवाड (वय 3) हा घराबाहेर पडला. चालत-चालत सकाळी दहाच्या सुमारास तो लता मंगेशकर शाळेजवळ येऊन रडत बसला. घरी कसे जावे, हे त्याला कळेनासे झाले. बराच वेळ झाला तरी तो घरी न आल्याने व परिसरात शोधूनही कुठे सापडत नसल्याने घरचे पुरते घाबरले. लता मंगेशकर शाळेजवळ चिमुकला रडत असल्याचे महिला पोलिस कर्मचारी आर. एन. काळे यांनी पाहिले. त्यांनी नाव, कुठे राहातो आदी प्रश्‍न विचारले. त्याला काहीच सांगता आले नाही.

पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याला पोलिस ठाण्यात आणले. समजूत काढली, खाऊ दिला. उपनिरीक्षक सी. एस. गुसिंगे यांनी दुपारी चिमुकल्याचा फोटो आणि पोलिस ठाण्याचा क्रमांक "पोलिस अँड प्रेस' या व्हॉट्‌सऍप ग्रुपवर शेअर केला.

प्रेमला घेऊन जाण्याचे आवाहन केले. ही पोस्ट पाहून हरी गायकवाड व पत्नी पोलिस ठाण्यात आले. "व्हॉटस्‌ऍप ग्रुप'वरून आम्हाला समजले, हा आमचा मुलगा आहे', असे त्यांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी प्रेमला त्यांच्या ताब्यात दिले. सुमारे पाच तासांनी मुलगा घरी आल्यानंतर कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला. 

loading image
go to top