esakal | सलग दुसऱ्या दिवशी शहरात दमदार पाऊस
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

कळंब तालुकावासीयांची प्रतीक्षा कायम 

सलग दुसऱ्या दिवशी शहरात दमदार पाऊस

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उस्मानाबाद ः कळंब तालुका वगळता जिल्ह्यात रविवारी (ता. एक) पावसाने सर्वदूर हजेरी लावली. प्रदीर्घ विश्रांतीनंतर पावसाने सलग दोन दिवसांपासून दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

 
गेल्या अनेक दिवसांनंतर शहरात पहिल्यांदाच चांगला पाऊस झाला आहे. सकाळी पावसाच्या सरी बरसल्या; मात्र त्यानंतर ढगाळ वातावरण होते. दुपारी चारनंतर शहरात जोरदार पावसाला सुरवात झाली. सुमारे तासभर झालेल्या पावसामुळे गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी बाजारात आलेल्या गणेशभक्‍तांची चांगलीच तारांबळ उडाली. साडेपाचनंतरही शहरात संततधार सुरू झाली. मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा शहरात आल्यानंतरही पाऊस सुरू होता. त्यामुळे यात्रेतील कार्यकर्ते चांगलेच ओलेचिंब झाले होते. 
गेली अनेक दिवस शहराला मोठ्या पावसाने हुलकावणी दिली होती.

रविवारी झालेल्या दमदार पावसाने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. शहरात आठवडे बाजार होता. यातील ग्राहक, शेतकरी आणि व्यापारी यांची चांगलीच तारांबळ उडाली. गणरायाच्या आगमनाची तयारी करणाऱ्या अनेक गणेशभक्तांना पावसाने चांगलेच भिजविले. 

loading image
go to top