Amol Bare
sakal
बजाजनगर - वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तिसगाव शिवारात शेतमजूराची जुन्या वादातून धारदार शस्त्राने हत्या केली. ही घटना रविवारी (ता. चार) रात्री पावणे अकराच्या सुमारास ओॲसिस चौक ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील अब्बास पेट्रोल पंपासमोर घडली. अमोल एकनाथ बारे (वय ३१ रा. नायगाव, बकवालनगर) मृत शेतमजुराचे नाव आहे.