

Night Wheat Harvest Turns Risky for Farmers
Sakal
महेश रोडे
निल्लोड : रब्बी हंगाम जोरात सुरू असताना निल्लोड परिसरातील शेतकरी जीव मुठीत धरून रात्री गहू भरणीचे काम करत आहेत. दिवसा मजुरांची तीव्र टंचाई, वेळेचा ताण आणि हवामानातील अनिश्चितता यामुळे शेतकरी कुटुंबासह रात्री उशिरापर्यंत शेतात काम करण्यास मजबूर झाले आहेत. मात्र अपुऱ्या प्रकाशात सुरू असलेल्या या कामामुळे शेतकऱ्यांची सुरक्षा गंभीर धोक्यात आली आहे.