

Latur News
esakal
निलंगा: मसलगा येथील मध्यम प्रकल्पाच्या पाळूला पडलेल्या भेगामुळे खबरदारी म्हणून मागील दोन वर्षांपासून या प्रकल्पात पाणी साठवले जात नव्हते. दुरुस्तीसाठी शंभर कोटीचे अंदाज पत्रकही तयार करण्यात आले. मुख्यमंत्री, पालकमंत्री आदींनी पाहणी केली. उन्हाळ्यामध्ये काम सुरू करण्याबाबत आदेश दिले होते. मात्र अद्यापही काम सुरू झाले नाही. दुरुस्ती बाबत खुद्द मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊनही या कामाला अजूनही मुहूर्त लागला नाही. या प्रकल्पावर अवलंबून असलेल्या दहा गावांच्या पाणीपुरवठा योजना आहेत. या प्रकल्पावर आधारित असलेली गावे सध्या तहानलेली दिसत आहेत.