

Dharashiv News
esakal
निलंगा: लातूर व धाराशिव जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या माकणी (ता. लोहारा) येथील निम्न तेरणा प्रकल्प पूर्ण होऊन बेचाळीस वर्षे झाली असला तरी डाव्या व उजव्या कालव्याची कामे अद्याप अपूर्णच आहेत. त्यामुळे सिंचन क्षेत्र वाढीचा हेतू साध्य झालेला नाही. कालव्यांसाठी आणखी किती वर्षे वाट पाहावी लागणार, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत.