

Latur News
esakal
निलंगा: मांजरा नदीवर दोन दशकांपूर्वी लातूर पाटबांधारे विभागाने निलंगा तालुक्यातील औराद-वांजरखेडा व देवणी तालुक्यातील सिंधीकामठ येथे कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे उभारलेले होते.
मात्र, पूरस्थितीत गेट उघडणे व पूर ओसरल्यानंतर पाणी अडवणे जिकरीचे व्हायचे. त्यामुळे जलसंपदा विभागाने या दोन्ही ठिकाणचे उच्च पातळीच्या बंधाऱ्यात रूपांतर करण्यास मंजुरी दिली. या तांत्रिक कामासाठी ११३ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे वांजरखेडा, सिंधीकामठ भागाला जलसंजीवनी मिळणार आहे.