

A large pit near the embankment of Nillod Percolation Tank No. 1 has raised serious concerns about the dam's safety during the monsoon.
Sakal
महेश रोडे
निल्लोड : निल्लोड येथील पाझर तलाव क्रमांक १ च्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, धरणाच्या पाळूच्या पायथ्याशी तब्बल १५ ते २० फूट लांबीचा मोठा खड्डा पडल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षी धरणाच्या भिंतीतून गळती सुरू झाल्याची घटना घडून एक वर्षाचा कालावधी लोटला असला, तरी अद्याप कायमस्वरूपी दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.